पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'दी लायन किंग'ची आठवड्याभरात बक्कळ कमाई

दी लायन किंग

 'दी लायन किंग' प्रदर्शित होऊन एक आठवडा पूर्ण झाला आहे. इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, तामिळ भाषेत हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे भारतीयांकडून  खूप चांगला प्रतिसाद या चित्रपटाला लाभला आहे. या चित्रपटानं ८१. ५७ कोटींची कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे. 

या चित्रपटातलं सिम्बा हे कार्टुन कॅरेक्टर नव्वदच्या दशकात जन्मलेल्या अनेक मुलांसाठी खूपच जवळचं होतं. सिम्बा या नावानं  कार्टुन सीरिजही  आली होती.  नव्वदच्या दशकातील या लोकप्रिय  चित्रपटाचा रिमेक काढण्यात आला आहे. १९ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित झाला.

 जाणून घ्या 'कबीर सिंह' आणि 'सुपर ३०'ची आतापर्यंतची कमाई

'दी लायन किंग'नं पहिल्या दिवशी ११. ०६ कोटींची तर रविवारी सर्वाधिक म्हणजे २४.५४ कोटींची कमाई केली होती. २०१९ मध्ये भारतीय बॉक्स ऑफिसवर कमी कालावधीत एवढी कमाई करणारा हा 'अ‍ॅव्हेंजर्स एडगेम्स'नंतरचा दुसरा हॉलिवूड चित्रपट ठरला आहे.

समीरा रेड्डीचा बालपणीचा फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

या आठवड्याच्या अखेरीस 'दी लायन किंग' १०० कोटींचा गल्ला पार करेन असा अंदाज वर्तवला जात आहे. विशेष म्हणजे कबीर सिंह, सुपर ३० असं मोठे चित्रपट प्रदर्शित झाले असताना या चित्रपटानं बक्कळ कमाई केली आहे.