पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सलमानचा हस्तक्षेप भन्साळींना रुचला नाही?

सलमान खान- संजय लीला भन्साळी

सलमान खान आणि संजय लीला भन्साळींचा 'इंशाअल्लाह' चित्रपट गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटावर तूर्त कोणतंही काम करणार नाही असं भन्साळी यांच्या निर्माता संस्थेनं स्पष्ट केलं आहे. चित्रीकरण सुरु व्हायला दोन दिवस उरले असताना हा प्रोजेक्ट पूर्णपणे थांबवण्यात आला आहे.

'इंशाअल्लाह'ऐवजी हा चित्रपट होणार ईदला प्रदर्शित

सलमाननं हा चित्रपट सोडला असल्याचं म्हटलं जात आहे.  सलमान खानचा चित्रपटाच्या कथेतील हस्तक्षेप भन्साळींना रुचला नाही म्हणूनच या चित्रपटावर काम न करण्याचं भन्साळींनी ठरवलं आहे. उत्तरार्धातील  कथेवरून दोघांमध्ये मतभेद झाले  असल्याचं समजत आहे. 

अजय देवगन घेतली आलिशान कार, फक्त दोन भारतीयांकडेच आहे ती कार

'काही महिन्यांपूर्वी या चित्रपटासाठी  त्यांनी मला  विचारलं होतं. मलाही चित्रपट आवडला होता, आम्ही चित्रपटासाठी एकत्र आलो. पण मला एक ठावूक आहे की भन्साळी आपल्या चित्रपटासोबतही कधीही गद्दारी करणार नाही. हा चित्रपट त्यांना जसा हवाय तसाच तो साकारला जावा अशी माझी इच्छा आहे.', असं सलमान मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.  भविष्यात आम्ही दोघंही नक्कीच एकत्र काम करू.  आम्ही दोघंही एकमेकांचे चांगले मित्र म्हणून राहू असंही सलमाननं सांगितलं.