आपल्या नव्या सुनेच्या वाढदिवशी अंबानी कुटुंबीयांनी एक खास व्हिडीओ तयार केला होता. अंबानी कुटुंबातली मोठी सून श्लोकाचा हा लग्नानंतरचा पहिलाच वाढदिवस होता. हा वाढदिवस अधिक खास व्हावा यासाठी अंबानी कुटुंबीयांनी परिकथेला साजेल असा खास व्हिडीओ तयार करून घेतला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
श्लोका आणि आकाश अंबानी मार्च महिन्यात विवाहबंधनात अडकले. डोळ्याचे पारणं फेडणारा हा भव्य दिव्य असा सोहळा होता. या सोहळ्यातील प्रत्येक गोष्ट ही परिकथेत साजेशी ठरेन अशा राजकुमार- राजकुमारीच्या विवाह सोहळ्यासारखीच होती. लग्नानंतर श्लोकाचा पहिलाच वाढदिवस जून महिन्यात झाला.
वाढदिवशी श्लोकाला खास शुभेच्छा देणारा व्हिडीओ अंबानी कुटुंबीयांनी तयार करून घेतला होता. या व्हिडीओत श्लोकाचे बालपणीचे अनेक व्हिडीओ, फोटो होतेच पण त्याचबरोबर अंबानी कुटुंबीय, इशा अंबानी, आनंद पिरामल, राधिका मर्चंट, श्लोकाच्या कुटुंबीयांनी तिला दिलेले खास संदेशही होते.