पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'स्टारकिड्समुळे मलाही चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला होता'

अभिनेत्री तापसी पन्नू

बॉलिवूड आणि त्यात असणाऱ्या घराणेशाहीवर आतापर्यंत  बाहेरून आलेल्या अनेक कलाकारांनी आवाज उठवला आहे. यात कंगनापासून ते तापसी पन्नू सारख्या आघाडीच्या अभिनेत्रींचा समावेश आहे. घराणेशाहीमुळे बॉलिवूडमध्ये अनेक संधी नाकारल्या गेल्या असल्याचे आरोप अनेक अभिनेते, अभिनेत्रींनी केले आहेत. नुकताच प्रदर्शित झालेल्या 'थप्पड' या चित्रपटाची नायिका तापसीनंही  याचा वाईट अनुभव पिंक व्हिलाला दिलेल्या मुलाखतीत शेअर केला आहे. 

तृतीयपंथीयांसाठी घर बांधण्याकरता अक्षयनं दिले १.५ कोटी

'स्टारकिड्समुळे मलाही संधी नाकारण्यात आली होती, मलाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. तो एक काळ होता जेव्हा मी खूप रडले होते. हे आतादेखील माझ्यासोबत होऊ शकतो. या क्षेत्रात घराणेशाही आहे मात्र त्यामुळे तुम्हाला काम मिळत नाही म्हणून रडत बसायचं की परिस्थितीतून मार्ग काढून पुढे जायचं हे तुम्ही ठरवायचं' असं  तापसी, संबंधित वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. 

दीपिकाच्या 'द इंटर्न'मधून ऋषी कपूर घेणार माघार?

गेल्यावर्षी 'पती पत्नी और वो'  या चित्रपटातून तापसीला बाजूला करून अनन्या पांडे या स्टारकिडला संधी देण्यात आली होती. तापसीनं यावर आवाजही उठवला होता. तापसीनं आतापर्यंत बॉलिवूडमध्ये थप्पड, नाम शबाना,  बेबी, पिंक, सांड की आँख, मनमर्झिया, मिशन मंगल, सुरमा, बदला यांसारखे हिट चित्रपट दिले आहेत.