पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ही कसली प्रगती?, अभिनेत्रीचा मुंबईकरांना सवाल

तेजस्विनी पंडीत

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. ही मायानगरी स्वप्नांची नगरी म्हणूनही ओळखली  जाते, म्हणूनच की काय देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो  लोक इथे आपल्या स्वप्नपूर्तीसाठी येत असतात. मात्र स्वत:च्या प्रगतीच्या मार्गावरून चालताना आपण या शहरात समस्यांचं डोंगर उभं केलंय. या समस्यांनी कधी भीषण रुप घेतलं  हे मुंबईकरांनाही कळलं नाही.  

Video : सेटवर बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला अक्षयनं वाचवलं

 प्रवासासाठी आपण रस्त्यांचं जाळं विणलं  मात्र याच रस्त्यात आपण तासन् तास अडकून पडलो. मुंबईतल्या खड्ड्यांनी अनेकांचे जीव घेतले. मुंबईकरांची डोकेदुखी ठरलेल्या वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांच्या समस्येवर अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं भाष्य केलं आहे.

'देशाची आर्थिक राजधानी असा माझा लौकिक. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रत्येकाला मी माझ्यात सामावून घेतले. प्रत्येकाच्या प्रगतीसाठी हृदयाप्रमाणे अखंडित धड्कत राहणारी मी ! जीवनाचा -प्रगतीचा वेग वाढवणाऱ्या रस्त्याचं जाळ तू इथे विणलं नसतंच तरच नवल होतं पण त्यावरील अगणित खड्डे? ते मात्र जीवघेणे ठरतायेत. सगळीकडे फक्त ट्राफिक आणि ट्राफिक....हि कसली प्रगती? हरवलेय मी या कोलाहलात मला भक्तांची आर्जवे ऐकू येत नाहीत की समुद्राची गाज अहोरात्र ऐकू येतो तो कर्णकर्कश्श होर्न आणि गोंगाट.'  अशा शब्दात तिनं मुंबईची समस्या  मांडली आहे. 

विश्वासू नोकराने सचिन पिळगावकरांची सन्मानचिन्हे चोरून भंगारात विकली

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सप्तमी " मुंबादेवी" . . देशाची आर्थिक राजधानी असा माझा लौकिक ....देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रत्येकाला मी माझ्यात सामावून घेतले.....प्रत्येकाच्या प्रगतीसाठी हृदयाप्रमाणे अखंडित धड्कत राहणारी मी !!! जीवनाचा -प्रगतीचा वेग वाढवणाऱ्या रस्त्याचं जाळ तू इथे विणलं नसतंच तरच नवल होतं........पण त्यावरील अगणित खड्डे? ..ते मात्र जीवघेणे ठरतायेत....सगळीकडे फक्त ट्राफिक आणि ट्राफिक....हि कसली प्रगती? हरवलेय मी या कोलाहलात ....मला भक्तांची आर्जवे ऐकू येत नाहीत की समुद्राची गाज ....अहोरात्र ऐकू येतो तो कर्णकर्कश्श होर्न आणि गोंगाट... हि माझी नगरी .....मी मुंबा आणि हि माझी मुंबा पुरी ..मुंबई!!! . . Concept & Director : @dhairya_insta_ Photographer : @bharatpawarphotography Digital art by : @amol.hirawadekar @imvishalshinde @thenameisabhishekk Asst. Dir : @shraddha_kakade Jewellery by : @pngadgilandsons Makeup : @vinodsarode Hair : @sheetalpalsande Styled by : @stylistnakshu @@saniyacool @pottering.vels Costumes By : @official_dadfashionstudio PR & Social Media By : @dreamers_pr Special Thanks : @rjadhishh @@jyotsnapethkar #navratri #tejaswinipandit

A post shared by Tejaswini Pandit (@tejaswini_pandit) on

 नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीची विविध रुपे साकारण्याची आगळीवेगळी संकल्पना अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं प्रत्यक्षात उतरवली आहे. घटस्थापनेच्या पाहिल्या दिवसांपासून ती देवीच्या विविध रुपांत दिसली. या  प्रत्येक रुपात तिनं समाजातील अनेक समस्या ठेवल्या.