पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'जान्हवी' परत येतेय पण नव्या रुपात

तेजश्री प्रधान

झी मराठी या वाहिनीवरील ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमुळे  अभिनेत्री तेजश्री प्रधान नावारुपाला आली. या मालिकेतील 'जान्हवी' या भूमिकेमुळे तिला नवी ओळख मिळाली. ही मालिका संपून काळ लोटला मात्र आजही प्रेक्षकांच्या मनात 'जान्हवी'ची ती प्रतिमा ताजी आहे. तिला तेजश्री या नावापेक्षा 'जान्हवी' याचं नावानं प्रेक्षक ओळखतात. तर अशी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान याच वाहिनीवर परतत आहे. 

तेजश्री ही  ‘अग्गंबाई सासूबाई..’ या मालिकेत पहायला मिळणार आहे.  २२ जुलैपासून ही मालिका झी मराठी या वाहिनीवर सुरू होत आहे.  ‘लग्न सासूचं….करवली सुनबाई, अग्गंबाई सासूबाई..!!’ असं लिहित झी मराठीने नव्या मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. विशेष म्हणजे या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री निवेदित सराफ तेजश्रीच्या सासुबाईंची भूमिका  साकारत आहे. या  मालिकेत आता इतर कोणते कलाकार दिसणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

माझ्या प्रिय रसिक मायबाप प्रेक्षका...I received , still receiving.. so many msgs on my , "अगबाई सासूबाई " story🤗 And it is really difficult for me to acknowledge each and every msg 😢 as they tooooooooo many( and from last evening also the networks are not really supporting). But I read them all and m speechless and m totally overwhelmed by ur love and concern 🙏 I just want to assure each one of you that "मला तुमच्या प्रेमाची जाणीव तेव्हाही होती ..आजही आहे आणि कायम राहील... आणि ही कृतज्ञता माझ्या कामातून तुमच्या पर्यंत पोहोचत रहील"... #HaapyMe #HappyLife

A post shared by Tejashri Pradhan (@tejashripradhan) on

तेजश्रीला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पहायला मिळणार यामुळे प्रेक्षकही खूश आहेत. तिला या मालिकेसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत.  'मला तुमच्या प्रेमाची जाणीव तेव्हाही होती. आजही आहे, ती कायम राहिन आणि ही कृतज्ञता माझ्या कामातून तुमच्या पर्यंत पोहोचत रहिन' असं लिहित तेजश्रीनं चाहत्यांचे आभार मानले आहेत.