पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अग्गबाई! 'सुनबाई' तेजश्री प्रधान चक्क बॉलिवूडमध्ये

बबलू बॅचलर

'होणार सून मी या घरची',  'अग्गबाई सासूबाई' यांसारख्या मालिकांमधून मराठी रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान आता बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवायला सज्ज झाली आहे. अभिनेता शरमन जोशी आणि पूजा चोप्रा यांच्या 'बबलू बॅचलर' या आगामी चित्रपटात तेजश्री महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 

गायकानं एकाच इमारतीत घेतले ९.१ कोटींचे चार फ्लॅट

तेजश्रीनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर 'बबलू बॅचलर' चा फर्स्ट लूक शेअर केला आहे. दोन दिवसांपूर्वी या  चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला. तेजश्रीनं मालिकेच्या यशानंतर  नाट्य आणि चित्रपटसृष्टीतही काम केलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#babloobachelor 😊😊😊

A post shared by Tejashri Pradhan (@tejashripradhan) on

तिचं 'कारटी काळजात घुसली' हे नाटक आणि 'ती सध्या काय करतेय' हा चित्रपट खूपच गाजला होता. तिची प्रमुख भूमिका असलेली 'अग्गबाई सासूबाई' ही मालिकाही प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहेत. आता तेजश्रीनं बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावून पहायचं ठरवलं आहे. २० मार्चला तिचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिचा पहिला हिंदी चित्रपट पाहण्यासाठी तिचे मराठी चाहते  खूपच उत्सुक आहेत. 

सायलीच्या 'बस्ता'साठी अजय गोगावलेचं मधुर आवाजातलं गीत