पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'तारक मेहता'मधील भाषा वाद अन् नंतर निर्मात्याचं स्पष्टीकरण

तारक मेहता का उल्टा चष्मा

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या लोकप्रिय मालिकेत मुंबईची भाषा हिंदी असल्याचं दाखवल्यानं  सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी निर्माते असित मोदी आणि मालिकेतील मराठी कलाकारांना धारेवर धरलं, त्यानंतर मोदी यांनी ट्विट करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

काय म्हणाले असित मोदी 
मुंबई महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे यात काही वादच नाही. मी भारतीय आहे. महाराष्ट्रीय आहे, गुजरातीपण आहे. सर्व भाषांचा मी आदर करतो... जय हिंद', असं ट्विट करून असित मोदी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

काय आहे वाद
'तारक मेहता का उल्टा चश्मा'  मालिकेतील एका भागात जेठालालचे वडील म्हणेजच बापुजी मुंबईची भाषा हिंदी असल्याचं सोसायटीतील इतर सदस्यांना सांगताना दिसत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर अक्षेप घेतला असून सब टीव्हीनं याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली आहे.

मनसेची खरमरीत टीका 
मुंबईची भाषा मराठी आहे हे सर्वांना माहिती असूनही मालिकांमधून पद्धतशीपणे अपप्रचार सुरु आहे. यांची मस्ती उतरवावीच लागेल. यात काम करणाऱ्या मराठी कलाकारांनाही यात चूक वाटत नाही, याची शरम वाटते अशी टीका अमेय खोपकर यांनी केली आहे. 


या ट्विटनंतर असित मोदीनं आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.