गेल्या दोन वर्षांपासून हो- नाही करत अखेर 'दयाबेन' ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत परतणार हे आता जवळजवळ निश्चित झालंय. मालिकेच्या सोशल मीडिया अकाऊंटवर प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यात दयाबेनच्या वापसीचे संकेत देण्यात आलेय. हा प्रोमो पाहून दया म्हणजेच दिशाचे चाहते खूपच खूश झाले आहेत.
'सुपर स्टार सिंगर'ला हवेत लतादीदींचे आशीर्वाद
दयाच्या वापसीचा व्हिडीओ अल्पावधीतच चाहत्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. सप्टेंबर २०१७ पासून दिशा सुट्टीवर आहे. प्रसूती रजेनंतर ती मालिकेत परतणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र ती परतली नाही. या गोष्टीला आता दोन वर्षे उलटली. दिशाच्या लाखो चाहत्यांना तिच्या परतीची अपेक्षा होती. अखेर ती मालिकेत परतणार आहे याबद्दल मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी काही दिवसांपूर्वी सकारात्मकता व्यक्त केली होती.आता सोशल मीडियावर व्हायरल होणार व्हिडीओ पाहता दिशा लवकरच मालिकेत पाहायला मिळणार असंच दिसतंय.
Kya lagta hai aapko, koun lekar aaya hoga Jethalal ke ghar yeh saamaan? Hai yeh Daya Bhabhi ki waapsi ka ishaara yaa kismat phir se le rahi hai Jethalal ka imtihaan? Janne ke liye dekhiye #TMKOC aaj raat thik 8:30 baje. pic.twitter.com/OebiOydr2B
— TMKOC (@TMKOC_NTF) October 7, 2019
'इफ्फी'मध्ये इंडियन पॅनोरमासाठी पाच मराठी चित्रपटांची निवड
दिशानं २०१५ साली व्यावसायिक मयूर पांड्या याच्यासोबत विवाहगाठ बांधली. नोव्हेंबर २०१७ साली तिनं मुलीला जन्म झाला. सप्टेंबर २०१७ पासून ती प्रसुती रजेवर होती. प्रसूती रजेनंतर ती मालिकेत परतणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र ती परतली नाही. तिने मालिकेत परतण्यासाठी निर्मात्यांपुढे काही अटी ठेवल्याची चर्चा होती. यातली पहिली अट म्हणजे, मानधनातील वाढ. मानधनासोबतच दिशाने कामाच्या वेळेतही बदल करण्याची मागणी केली होती.