पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

..म्हणून तनुश्रीला संजय लीला भन्साळींसोबत करायचंय काम

तनुश्री दत्ता

अभिनेत्री तनुश्री दत्ता ही मी टु मोहिमेमुळे चर्चेत आली. किंबहुना भारतातल्या मी टु मोहिमेची खरी जनक तनुश्रीलाच मानलं जातं. बॉलिवूडपासून जवळपास १० वर्षे  लांब राहिलेल्या तनुश्रीला चित्रपटात पुन्हा काम करण्याची इच्छा आहे आणि याकरता चांगल्या संधीच्या शोधात तनुश्री आहे. 

Frozen 2 : पहिल्यांदाच प्रियांका- परिणीती करणार एकत्र काम

 विशेष म्हणजे तिनं  संजय लीला भन्साळींसारख्या बॉलिवूडमधल्या आघाडीच्या दिग्दर्शकासोबत काम करण्याची इच्छाही प्रकट केली आहे.  मात्र संजय  लीला भन्साळी हे कितपत संधी देतील याबद्दल तनुश्री साशंक आहे. 'भन्साळी हे माझ्या आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक आहे. मला त्यांच्यासोबत काम करायचं आहे. मात्र ते केवळ बॉलिवूडच्या आघाडीच्या कलाकारांसोबतच काम करतात त्यामुळे ते मला कितपत संधी देतील हे सांगता येत  नाही', असं तनुश्री म्हणाली. 

Karwa Chauth 2019 : अनुष्कासाठी विराटनंही केला उपवास

'ज्या व्यक्तींसाठी तुम्हाला काम करायचं आहे त्यांच्या चित्रपटाच्या ऑडिशनसाठीही जाण्याची संधी तुम्हाला मिळत नाही. मात्र आता मला चांगली संधी हवी आहे. असं तनुश्री म्हणाली.