पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोप प्रकरणाला नवे वळण

तनुश्री दत्ता

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर केलेला गैरवर्तनाचा आणि छळाच्या आरोपांचा तपास गुन्हे शाखेकडे द्यावा, अशी मागणी तनुश्री दत्ता हिच्या वकिलांनी मंगळवारी मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे केली. त्यामुळे या प्रकरणाला पुन्हा नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात पोलिसांकडून सादर करण्यात आलेला बी अहवाल मागे घेण्यात यावा, अशीही मागणी तिच्या वकिलांकडून आयुक्तांकडे करण्यात आली.

चांद्रयान २ मधील अंतिम टप्पाही यशस्वी, शनिवारी चंद्रावर उतरणार

ओशिवारा पोलिसांनी या प्रकरणी केलेल्या तपासात अनेक त्रुटी आहेत. त्यावर बोट ठेवत तनुश्री दत्ता हिचे वकील नितीन सातपुते यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांना एक पत्र ई-मेलच्या माध्यमातून पाठविले आहे. तनुश्री दत्ता हिने केलेल्या आरोपांचे समर्थन करणाऱ्या अनेक जणांची साक्ष जाणीवपूर्वक ओशिवारा पोलिसांनी नोंदविलेलीच नाही, असेही सातपुते यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे.

लालबागच्या राजाच्या चरणी आतापर्यंतच्या सर्वात महागड्या वस्तू अर्पण

ओशिवारा पोलिसांनी या प्रकरणी अंधेरीतील महानगरदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात बी अहवाल सादर केला आहे. एखाद्या प्रकरणाचा तपास बंद करायचा असेल, तर पोलिसांकडून हा अहवाल सादर केला जातो. तनुश्री दत्ता हिने केलेल्या आरोपांचे कोणतेही पुरावे तपासात पोलिसांना आढळले नाहीत. त्यामुळेच या प्रकरणाचा तपास बंद करावा, अशी मागणी करणारा अहवाल पोलिसांकडून न्यायालयात सादर करण्यात आला. तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर केलेले आरोप चुकीचे आणि बदल्याच्या हेतूने केले आहेत, असेही निरीक्षण पोलिसांनी आपल्या अहवालात नोंदविले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Tanushree Dutta wants crime branch to probe her sexual harassment complaint against Nana Patekar