पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गणेश आचार्य नवोदितांचा गैरफायदा घेतो, तनुश्रीचा आरोप

तनुश्री दत्ता

 बॉलिवूडचा नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्यवर पुन्हा एकदा अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनं तोफ डागली आहे. गणेश आचार्यवर बॉलिवूडनं बहिष्कार टाकला पाहिजे असं ती म्हणाली. गणेश आचार्य आपल्या पदाचा गैरवापर करुन नवोदितांना त्रास देतो, त्यांचा गैरफायदा घेतो, असा आरोप तनुश्रीनं केला आहे. 

 मंगळवारी ३३ वर्षीय महिलेनं गणेश आचार्यवर गंभीर आरोप केले होते. यात प्रौढांसाठीचे व्हिडिओ बघण्याची बळजबरी केल्याचा तसेच कामापासून वंचित ठेवल्याचा आरोप आहे. यावर प्रतिक्रिया देताना तनुश्री दत्ता हिनं गणेश आचार्यवर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. तनुश्री ही बॉलिवूडमधल्या मी टु चळवळीची प्रणेती मानली जाते. तिनं ऑक्टोबर २०१८ मध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि गणेश आचार्यवर गंभीर आरोप केले होते. तेव्हापासून तनुश्री चर्चेत आहे. 

PHOTOS : रसिकाचा 'बोल्ड अँड ब्युटीफुल' अंदाज

 बॉलिवूड आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीनं गणेश आचार्यवर बहिष्कार घालण्याची वेळ आता आली आहे. तो या क्षेत्रातल्या मोठ्या सुपरस्टार अभिनेत्याच्या मागे लपून राहतो. आपल्या पदाचा गैरवापर करून तो नवोदितांचा गैरफायदा घेतो, त्यांना त्रास देतो असा  गंभीर आरोप  तनुश्रीनं केला आहे. 

यापूर्वी ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शिक सरोज खान यांनी देखील गणेश आचार्यवर गंभीर आरोप केले होते. गणेश आचार्य हा त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या नवोदित डान्सरची पिळवणूक करतो असा आरोप त्यांनी केला होता. तर सरोज खान या केवळ आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असून त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकणार असं गणेश आचार्य म्हणाला. 

रजनीकांतनंतर अक्षय कुमारही दिसणार Man vs Wild मध्ये