पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' मराठीतही होणार प्रदर्शित !

तान्हाजी: द अनसंग वॉरियर

शूरवीर मराठा योद्धा तान्हाजी मालुसरे  यांच्या जीवनावर आधारित 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर'  मराठी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. दृश्यात्मक रोमांचाने परिपूर्ण असलेला 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' हा चित्रपट मराठीतही  प्रदर्शित होत असून १० डिसेंबरला या चित्रपटाचा पहिला मराठी ट्रेलर लाँच होत आहे.  

प्रियांका चोप्रा IMDB टॉप १० सिने- टीव्ही कलाकारांच्या यादीत 'नंबर १'

एका शूर मराठा योद्ध्याची कथा हिंदी  भाषेसह त्याच्या मातृभाषेत प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे, हे मी माझे भाग्यच समजतो. ज्या पद्धतीने संपूर्ण देशासमोर इतिहासाची पाने उलगडणार आहेत, त्याच दिमाखदार प्रवासाची अनुभूती समस्त महाराष्ट्राने घ्यावी, असं अजय देवगन म्हणाला. अजय या चित्रपटात तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारत आहे.

चित्रपटाला भरपूर यश मिळू दे, आमिरकडून 'पानिपत'च्या टीमला शुभेच्छा

'मला ही महाराष्ट्रीय व्यक्तिरेखा निभावणे प्रचंड भावले. सावित्री ही व्यक्तिरेखा कणखर आणि अफलातून आहे. माझ्यात तिच्यातले करारीपण चपखल उतरले. मी अत्यंत प्रतिकूल स्थितीतल्या तिच्या रुबाबाच्या प्रेमात आहे', अशी भावना काजोलनं व्यक्त केली आहे. 
या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा ओम राऊतने सांभाळली आहे. १० जानेवारी २०२० रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.