पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तान्हाजी मालुसरेंच्या साहसाचा आधारस्तंभ सावित्रीबाईंच्या भूमिकेत काजोल

सावित्रीबाईंच्या भूमिकेत काजोल

प्रत्येक यशस्वी आणि कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे एका स्त्री असते असं म्हणतात. स्वराज्यासाठी लाखो मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मावळ्यांनी कधीही घरदाराचा विचार केला नाही. मावळ्यांचं कतृत्व मोठं आहेच, पण त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या पत्नी, माता, भगिनी याही खऱ्या आधारस्तंभ आहे. 

तान्हाजी'मध्ये हा मराठी अभिनेता शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

स्वराज्याच्या ध्यासानं झपाटलेल्या तान्हाजी मालुसरे या शूर योद्धाची वीरगाथा 'तान्हाजी द अनसंग वॉरियर'च्या या चित्रपटाच्या निमित्तानं तमाम प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री काजोल सावित्रीबाईंच्या भूमिकेत आहे. तान्हाजी मालुसरेंच्या भूमिकेत असलेल्या अजय देवगननं काजोलचा सावीत्रीबाईंच्या रुपातील फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. 

 झुंड : बच्चन यांना नोटीस, तर नागराज मंजुळेंवर गंभीर आरोप

काजोलचं मराठमोळं रुप चाहत्यांनाही आवडलं आहे. या चित्रपटात  अजय काजोलबरोबरच सैफ अली खान, शरद केळकरसह अनेक कलाकार दिसणार आहेत. १० जानेवारी २०२० ला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.