पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'एक दिवस रेड कार्पेटवर नऊवारी साडीच नेसून जाईन'

काजोल

'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' हा चित्रपट  जानेवारी महिन्यात प्रदर्शित होत आहे.  मराठा साम्राज्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या तानाजी मालुसरेंच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात अजय देवगन तानाजी मालुसरेंची भूमिका साकारत आहे तर काजोल तानाजी मालुसरेंच्या पत्नी सावित्रीबाईंच्या भूमिकेत आहे. 

'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' मराठीतही होणार प्रदर्शित !

काजोल पहिल्यांदाच मराठमोळ्या रुपात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. काजोलच्या मराठी रुपाचं सर्वांनीच खूप कौतुक केलं. मला नववारी साडी, हा पेहराव इतका आवडला की एक दिवस रेड कार्पेटवर नऊवारी साडी नेसून जाईन, असा निर्धार तिनं व्यक्त केला. 

चित्रपटाला भरपूर यश मिळू दे, आमिरकडून 'पानिपत'च्या टीमला शुभेच्छा

नऊवारी साडी परिधान करून सौंदर्य अधिक खुलून येतं असंही काजोल म्हणाली. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट १० जानेवारीला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट मराठीतही प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १० डिसेंबरला या चित्रपटाचा मराठी  ट्रेलर प्रदर्शित होत आहे.