पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Tanhaji Box Office: अजय देवगनच्या या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी कमावले इतके कोटी

तान्हाजी चित्रपटातील दृश्य

अजय देवगन, सैफ अलीखान आणि काजोलचा चित्रपट तान्हाजी द अनसंग वॉरियरने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी १५.१० कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर बॉक्स ऑफिस इंडियाच्या वृत्तानुसार दुसऱ्या दिवशी चित्रपटाने २० कोटी रुपये कमावले आहेत. म्हणजेच दोन दिवसांत चित्रपटाने ३५ कोटींच्या जवळपास कलेक्शन केले आहे. 

CAA वर मोदी म्हणाले, जे महात्मा गांधींनी म्हटलं होतं, तेच मी करत आहे

'तान्हाजी' भारतातील ३८८० स्क्रिन्सवर रिलीज झाला आहे. तर संपूर्ण जगभरात तो ४५४० स्किन्सवर रिलीज झाला आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाचा निर्माता अजय देवगन आहे. 

काश्मीरः हिजबूलच्या दोन दहशतवाद्यांसह कारमध्ये सापडला

अजय देवगनच्या या चित्रपटाच्या रिलीजनंतर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. यामध्ये अजय म्हणतो की, नमस्कार, मी अजय देवगन..जे प्रेम तुम्ही लोकांनी तान्हाजीला दिलं आहे, त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानतो. भारतीयांनी आणि भारताबाहेर राहणाऱ्यांना सांगू इच्छितो की, त्यांनी तान्हाजी मालसुरे यांनी केलेला त्याग पाहावा आणि जगाला सांगावे. सर्वांचे धन्यवाद, तान्हाजी यूनाइट्स इंडिया.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Tanhaji The Unsung Warrior day 2 box office collection ajay devgn film tanhaji Strong Growth in second day