पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर 'तान्हाजी'चा बोलबाला

तान्हाजी द अनसंग वॉरियर

ओम राऊत दिग्दर्शित 'तान्हाजी द अनसंग वॉरियर'नं बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. सलग दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर 'तान्हाजी'चे वर्चस्व राहिले आहे. विशेषत: रजनीकांतचा 'दरबार' आणि दीपिका पादुकोनच्या 'छपाक'चं मोठं आव्हान असताना या चित्रपटानं एकूण १६७.४५ कोटींची कमाई केली आहे. 

बहिणीच्या उपचारासाठी वाईटातल्या वाईट चित्रपटातही काम केलं

आता या चित्रपटाची २०० कोटींच्या दिशेनं घोडदौड सुरु झाली आहे.  'तान्हाजी द अनसंग वॉरियर' हा अभिनेता अजय देवगनच्या  बॉलिवूड कारकिर्दीतला १०० वा चित्रपट आहे. तो या चित्रपटात तान्हाजी मालुसरेंच्या भूमिकेत आहे. दहा जानेवारीला हा चित्रपट राज्यात हिंदी आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. 

'तान्हाजी'त दाखवलेला इतिहास नाही म्हणणारा सैफ वादात

दुसऱ्या शुक्रवारी चित्रपटानं १०.६ कोटी, शनिवारी १६.३६ कोटी आणि  रविवारी २२.१२ कोटींचा  गल्ला जमवला. कोंढाणा किल्ला स्वराज्यात परत आणण्यासाठी  प्राणपणानं लढलेल्या तान्हाजी मालुसरे आणि मावळ्यांच्या शौर्याची कथा या चित्रपटात आहे. १० जानेवारील हा चित्रपट प्रदर्शित झाला. अजय व्यतिरिक्त काजोल, सैफ अली खान, शरद केळकर यांच्या प्रमुख भूमिका चित्रपटात आहेत.