पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यातही होणार 'तान्हाजी' करमुक्त, लवकरच घोषणा

तान्हाजी द अनसंग वॉरियर

उत्तर प्रदेश, हरियाणानंतर आता राज्यातही 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' चित्रपट  करमुक्त होणार आहे. 'तान्हाजी' करमुक्त करण्यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  घोषणा करतील, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. 'तान्हाजी चित्रपट करमुक्त कारण्यासंदर्भात आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमत झाले', असे त्यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले. 

पब्जी, छोटा भीमबरोबरच 'विकून टाक' च्या पतंगांनी व्यापलं आकाश

  ओम राऊत दिग्दर्शित 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' चित्रपट  १० जानेवारीला प्रदर्शित झाला. स्वराज्यासाठी प्राणाचं योगदान दिलेल्या तान्हाजी मालुसरेंची शौर्यगाथा या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे.  हा चित्रपट महाराष्ट्र वगळता इतर काही राज्यात करमुक्त करण्यात आला मात्र महाराष्ट्रात हा चित्रपट कधी करमुक्त होणार, असा प्रश्न वारंवार विचारला जात होता. अखेर हा चित्रपट करमुक्त कारण्यासंदर्भात  बुधवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या  बैठकीत निर्णय घेण्यात आला. 'करमणूक करही आता जीएसटीच्या अखत्यारीत येत असल्याने राज्य सरकार SGST चा परतावा देणार आहे, मुख्यमंत्री लवकरच तान्हाजी द अनसंग वॉरिअर करमुक्त करणार असल्याची घोषणा करतील', अशी  माहिती थोरात यांनी दिली.

Confirmed : 'गो गोवा गॉन २' येतोय!

'महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यासंदर्भात मला पत्र लिहून महाराष्ट्रातील चित्रपट रसिक आणि शिवप्रेमींची 'तान्हाजी' चित्रपट करमुक्त करावा, ही भूमिका आग्रहाने मांडली होती', असंही थोरात यांनी सांगितलं. तसेच ‘तान्हाजी’ हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी  पत्राद्वारे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. 

कपिल शर्माच्या चिमुकलीचे फोटो व्हायरल