पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दाक्षिणात्य अभिनेत्यानं सेटवरील ४०० सदस्यांना भेट दिल्या सोन्याच्या अंगठ्या

अभिनेता विजयनं भेट दिल्या सोन्याच्या अंगठ्या

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय यांनं सेटवरील ४०० सदस्यांना सोन्याच्या अंगठ्या भेट म्हणून दिल्या आहेत. विजयचा 'बिगिल' चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं आहे. चित्रपटासाठी दिवसरात्र  मेहनत घेणाऱ्या टीममधील ४०० सदस्यांना विजयनं ही खास भेट दिली आहे.

Raksha Bandhan 2019 : 'गरिबीच्या काळात तिनं राहायला घर दिलं'

चित्रपटाच्या चित्रीकरणात मोलाचा वाटा देणाऱ्या टीमप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विजयनं ही भेट दिली आहे. या अंगठ्यांवर चित्रपटाचं नावही कोरलं आहे.

Video : चालकाकडून पैसे उधार घेऊन जान्हवीची गरीब मुलीला मदत

'बिगिल' हा विजयचा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. या चित्रपटात तो फुटबॉल कोचची भूमिका साकारत आहे. यासाठी त्यानं विशेष प्रशिक्षणही घेतलं आहे. 'बिगिल'च्या टीममध्ये काम करणाऱ्या अनेक सदस्यांनी  विजयनं दिलेल्या खास भेटीचा फोटो ट्विट केला आहे.