पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स!

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि तमन्ना भाटिया

आपल्या अदाकारीने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी कायमच प्रेक्षकांचे मन जिंकतात. ते ज्या ज्या चित्रपटांमध्ये काम करतात, तिथे आपल्या अभिनयाची छाप पाडतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सेक्रेड गेम्स सिझन २ मध्येही नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी आपल्या सक्षम अभिनयाचा दाखला दिला. अनेकांनी या वेबसीरिजमधील त्यांच्या अभिनयाची प्रशंसा केली. नवाजुद्दीन सिद्दीकीचा बोले चुडिया हा नवा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटात ते अभिनेत्री तमन्ना भाटिया सोबत दिसणार आहेत.

SC च्या निकालानंतर ठरणार कर्नाटकमधील पोट निवडणुकीचा मुहूर्त!

विशेष म्हणजे बोले चुडिया या चित्रपटात कोणताही ऍक्शन सीन नसणार किंवा वाद-विवाद पण नसणार आहेत. हा केवळ एक रोमँटिक चित्रपट आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. या व्हिडिओमध्ये ते तमन्ना भाटिया हिच्यासोबत रोमान्स करताना दिसताहेत.

ऑलिम्पिकवीर कुस्तीपटूसह भारताचा माजी हॉकीपटू भाजपात

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना नवाजुद्दीन सिद्दीकीने लिहिले आहे की, आता आपल्याला आयुष्यात कोणतही लफडं नकोय. फक्त रोमान्स आणि फॅमिली हवी. या माध्यमातून मी तुमच्याशी बोले चुडिया चित्रपटाची एक झलक शेअर करतोय. तुम्हाला ती नक्की आवडेल, अशी आशा आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:tamannaah bhatia romancing with nawazuddin siddiqui in bole chudiyan video viral on social media