पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सिनेमात 'नो किसिंग सीन'साठी तमन्ना भाटियाने तयार केला हा नियम

तमन्ना भाटिया

दाक्षिणात्य चित्रपटातील आघाडीची अभिनेत्री तमन्ना भाटिया आयुष्य आपल्या अटींवर जगते. तमन्नाने आता बॉलिवूडमध्येही आपले स्थान निर्माण केले आहे. अनेकांकडून तिच्या अभिनयाची कायम प्रशंसा केली जाते. तमन्नाचे सर्वात मोठे वेगळेपण म्हणजे तिने आतापर्यंत कोणत्याही चित्रपटात एकही चुंबन दृश्य (किसिंग सीन) दिलेले नाही. तमन्ना भाटिया जेव्हा नव्या चित्रपटासाठी करार करते. त्यावेळी सर्वात आधी ती नो किसिंग सीन हे आपले धोरण अंमलात आणते. किसिंग सीन नसेल तरच ती चित्रपटाचा करार करते. 

निवडणुकीनंतर महाराष्ट्रात जे घडलं तो मतदारांचा अपमान - राज ठाकरे

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये तमन्नाने स्वतः सांगितले की आजही तिने आपल्या नो किसिंग सीन धोरणात किंचितही बदल केलेला नाही. जेव्हापासून मी सिनेक्षेत्रातील करिअरची सुरुवात केली, तेव्हापासून मी या धोरणाचा स्वीकार केला असल्याचे तिने स्पष्ट केले. 

फडणवीसांच्या मानगुटीवर अद्याप सत्तेचे भूत, शिवसेनेची टीका

मिळालेल्या माहितीनुसार २००५ मध्ये चांद सा रोशन चेहरा या चित्रपटातून तिने आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये मोठे यश मिळवल्यावर बॉलिवूडमध्ये तिने अजय देवगण, सैफ अली खान आणि रितेश देशमुख यांच्यासोबत काम केले आहे. सध्या ती नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम करीत आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.