पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून 'भारत'च्या ट्रेलर, प्रमोशनमध्ये तब्बू कुठेच नाही

तब्बू

सलमान खानचा 'भारत' चित्रपट येत्या ५ जूनला प्रदर्शित होत आहे. गेल्यावर्षी आलेला 'रेस ३' फ्लॉप झाल्यानंतर सलमाननं आपल्या आगामी चित्रपटासाठी चांगली  कंबर कसली आहे. या चित्रपटात  सलमान खान, सुनील ग्रोवर, कतरिना कैफ, दीशा पटानी, तब्बू यांसारखे कलाकार पहायला मिळणार आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनला सुरूवात झाली आहे. मात्र या प्रमोशनमध्ये तब्बू कुठेच दिसली नाही. ट्रेलरमध्येही तब्बू दिसली नाही. ती या चित्रपटात सलमानच्या बहिणीची भूमिका साकारत आहे.  

भारत चित्रपटाच्या प्रमोशनपासून ती चार हात का लांब आहे याचं उत्तर तिनं एशियन एजला दिलेल्या मुलाखतीत दिलं आहे. 'मी भारत चित्रपटातील फक्त एकाच दृश्यात काम केलं आहे. ही अत्यंत छोटी भूमिका आहे म्हणूनच मी ट्रेलरमध्ये किंवा प्रमोशनमध्ये दिसली नाही  असं  तब्बू म्हणाली. दे दे प्यार दे  चित्रपटाचं  जोरदार प्रमोशन करणारी तब्बू मात्र भारत चित्रपटाच्या टीमबरोबर दिसली नाही म्हणूनच अनेकांनी तिला प्रश्न विचारले. मात्र मी या चित्रपटात अगदी लहान भूमिका साकारली आहे म्हणूनच प्रमोशनमध्ये सहभागी झाले नाही असं तब्बूनं स्पष्ट केलं आहे. 

काही दिवसांपूर्वी अली अब्बास जफार यानं तब्बू सोबत काम करण्यास आपण उत्सुक  असल्याचं सांगितलं होतं. मी तब्बूचा मोठा चाहता  आहे  मला तिच्यासोबत काम  करायचं आहे 'भारत'च्या निमित्तानं तिच्यासोबत काम करण्याचा योग जुळून आला असं तो म्हणाला होता. मात्र या चित्रपटातील केवळ एकाच दृश्यात आपण आहोत असं तब्बूनं स्पष्ट केलं आहे.  अली  अब्बास जफार दिग्दर्शित हा चित्रपट कोरिअन  चित्रपट  'ओडे टु माय फादर' चित्रपटापासून प्रेरित आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Tabu plays Salman Khan sister in Bharat but was missing from the films trailer and promotions