पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'भूल भुलैया २' मध्ये कार्तिक-किआरासोबत दिसणार अभिनेत्री तब्बू

भूल भुलैया २

जवळपास १३ वर्षांनंतर अक्षय कुमार- विद्या बालनच्या 'भूल भुलैया'चा सीक्वल येत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली. चित्रपटाच्या सीक्वलमध्ये अभिनेता कार्तिक आर्यन  प्रमुख भूमिकेत आहे. तर किआरा अडवाणी मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. 

'तान्हाजी'मध्ये हा मराठी अभिनेता शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

कार्तिक- किआराबरोबर अभिनेत्री तब्बूदेखील या  चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तब्बूच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.  अभिनेत्री किआरा अडवाणीनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तब्बूदेखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती दिली. 

प्रभासची जादू जपानमध्येही, पदार्थांच्या पॅकेजवरही फोटो

'भूल भुलैया २' च्या चित्रीकरणाला ऑक्टोबर महिन्यात सुरुवात झाली आहे.  २००७ साली प्रदर्शित झालेला 'भूल भुलैया' चा 'भूल भुलैया २' सीक्वल आहे. 'भूल भुलैया' मध्ये अक्षय कुमार, विद्या बालन, अमिशा पटेल, शायनी आहुजा हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. हा चित्रपट रजनीकांत यांच्या  तमिळ चित्रपट 'चंद्रमुखी'चा रिमेक होता. 'भूल भुलैया' हा तेव्हाचा सुपरहिट चित्रपट ठरल होता. त्यामुळे साहजिक 'भूल भुलैया २' कड़ून प्रेक्षकांच्या अपेक्षा खूपच वाढल्या आहेत. 'भूल भुलैया २' २१ जुलै २०२० मध्ये प्रदर्शित होत आहे.  

अभिनेता सुशांत सिंग राजपूतला डेंग्यू, उपचार सुरू