पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

‘तारक मेहता' मधील भाषेच्या वादावरून 'चंपक चाचां'चा मराठीतून माफीनामा

अमित भट्ट

‘तारक मेहता का उलटा’ चष्मा मालिकेतील मुंबईची भाषा हिंदी या संवादावरुन मोठा वाद निर्माण झाला. हा संवाद ज्या कलाकाराच्या तोंडी होता त्या 'चंपक चाचां'नी मराठीतून सर्वांची  माफी मागत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. 

या मालिकेतील 'चंपक चाचा' हे एका भागात मराठी ही मुंबईची भाषा असल्याचं सांगताना दाखण्यात आलं आहे. यावरून मोठा वाद झाला. मनसेनं यावर आक्षेप घेतला. मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे हे माहिती असताना देखील, मालिकेत अपप्रचार केला जात आहे असे लिहित महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आक्षेप घेतला होता. 

जपान : चित्रपटगृह कायमचे बंद करण्यापूर्वी दाखवला आमिरचा हिट चित्रपट

यावादानंतर मालिकेचे निर्माते असित मोदींनी जाहीर माफी मागितली, त्यानंतर 'चंपक चाचा' ही भूमिका साकारणारे कलाकार अमित भट यांनीही मराठीत माफी मागितली आहे. 

मला स्क्रिप्टमध्ये लिहून देण्यात आलेला संवाद मी कॅमेऱ्यासमोर बोललो…मुंबईची भाषा ही हिंदी नसून मराठी आहे आणि याचा आम्हाला अभिमान आहे. झालेल्या चुकीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो अशी चूक पुन्हा होणार नाही याची मी व्यक्तीशा दखल घेईल, अशा शब्दांत अमित भट यांनी माफी मागितली आहे.

या कलाकाराला महाराष्ट्रात उभारायचा आहे बुर्ज खलिफा!