पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तापसी महिला क्रिकेटर मितालीची भूमिका साकारणार

तापसी पन्नू साकारणार मिताली राजची भूमिका

भारताची माजी कर्णधार आणि महिला क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवणारी महिला क्रिकेटर मिताली राजचा जीवन प्रवास चित्रपटाच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे. मितालीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. 

'मुंबई मिरर'च्या वृत्तानुसार, २०१७ मध्ये भारतीय महिला क्रिकेटर मिताली राजच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटासंदर्भात तापसी पन्नू आणि चित्रपट निर्माता यांच्यात बोलणी झाले असून तिच्या नावावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाला आहे.  चित्रपटाच्या कथानकावर काम सुरु असून लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

यापूर्वी तापसी पन्नू शाद अली यांच्या 'सूरमा' चित्रपटात हॉकी खेळाडूच्या रुपात झळकली होती. मिताली राज भारताची एकमेव महिला क्रिकेटर आहे जिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६ हजारहून अधिक धावा केल्या आहेत. यात ७ शतकासह ५२ अर्धशतकांचा समावेश आहे. तब्बल दोन दशकांपासून ती भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करत आहे.