पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तापसीच्या 'थप्पड'ची बॉक्स ऑफिसवर संथ कमाई

तापसी पन्नू

घरगुती हिंसाचारावर भाष्य करणाऱ्या तापसी पन्नूचा 'थप्पड' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. मात्र अपेक्षेपेक्षाही  या चित्रपटाची सुरुवात अत्यंत संथ गतीनं झालेली पहायला  मिळाली. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर केवळ ३ कोटींची कमाई केली आहे. शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर बहिष्कार घालण्याची मागणी सोशल मीडियावर होत होती. 

पाच वर्षे विभक्त राहिल्यानंतर कोंकणा- रणवीरचा घटस्फोटासाठी अर्ज

 मात्र दीपिका पादुकोनचा 'छपाक', कंगनाचा 'पंगा' आणि राणीच्या 'मर्दानी'पेक्षा चित्रपटानं पहिल्या दिवशी चांगली कमाई केली आहे असं चित्रपट व्यापार विश्लेषकांचं म्हणणं आहे. अनुभव सिन्हा यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. भर पार्टीत नवरा सर्वांसमोर कानशीलात लागावतो आणि त्यानंतर त्या स्त्रीच्या मनात उठणाऱ्या असंख्य भावना आणि त्यातून उठलेल्या बंडाची कहाणी  'थप्पड' चित्रपटातून मांडली आहे.  

या चित्रपटाचं सोशल मीडियावर समीक्षकांनी खूपच कौतुक केलं, वरवर पाहता समाजासाठी अत्यंत साधी वाटणारी समस्या किती खोल आणि गंभीर आहे याची प्रचिती 'थप्पड' पाहिल्यानंतर येते, असं कौतुक समीक्षकांकडून करण्यात आलं. 

तेव्हा मात्र मी खूप दुखावले, तापसीनं सांगितला 'पिंक'चा अनुभव

तापसी अनुभव सिन्हासोबत दुसऱ्यांदा काम करत आहे. तिनं यापूर्वी मुल्ख या चित्रपटात त्यांच्यासोबत काम केलं आहे. बॉलिवूडमधलं तापसीचं करिअर पाहता तिनं नाम शबाना,  बेबी, पिंक, सांड की आँख, मनमर्झिया, मिशन मंगल, सुरमा, बदला यांसारख्या चित्रपटांत काम केलं आहे.