पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वादानंतरही तापसी म्हणते कंगना आवडती अभिनेत्री

तापसी पन्नू

तापसी पन्नू आणि कंगना या दोघींमधला वाद हा बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये सर्वश्रुत आहे. एका शुल्लक कारणामुळे झालेल्या वादानं टोक गाठलं.  मात्र वाद असला तरी कंगना ही आपल्या  आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आहे असं तापसी म्हणते.

एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तापसीला तिच्या आवडत्या आणि प्रेरणादायी अभिनेत्रींविषयी विचारण्यात आलं होतं. यावेळी क्षणाचाही विलंब न करता तापसीनं कंगना, प्रियांका आणि अनुष्काचं नावं घेतलं. या तिघीही माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत असं तापसी म्हणाली.

...म्हणून कंगनावर तापसी नाराज 

प्रियांकानं स्वत:ची वेगळी ओळख  निर्माण केली आहे, तर कंगनानं आवाज उठवला आहे. तिला ज्या गोष्टी पटल्या नाहीत किंवा तिला ज्या गोष्टी हव्या होत्या त्यासाठी तिनं न कचरता आवाज उठवला आहे म्हणून मला ती आवडते असं तापसी म्हणाली.

हृतिकचा समावेश 'जगातील रुबाबदार व्यक्तीं'च्या यादीत

तर अनुष्काही सर्वात प्रामाणिक अभिनेत्री आहे, असं कौतुक तापसीनं केलं आहे. कंगनाची बहीण रंगोली हिनं तापसीला कंगनाची स्वस्त कॉपी म्हणत टीका केली होती. तेव्हापासून कंगना आणि तापसीमध्ये वाद सुरू होता.