पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तेव्हा मात्र मी खूप दुखावले, तापसीनं सांगितला 'पिंक'चा अनुभव

तापसी पन्नू

अभिनेत्री तापसी पन्नू हिनं बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्लॅमरस  भूमिकांकडे न वळता तापसी  काहीशा गंभीर भूमिकेत पहायला मिळते. आतापर्यंत बेबी, नाम शबाना, गेम ओव्हर, मुल्ख, बदला, सांड की आँख, पिंक यांसारख्या चित्रपटात एकापेक्षा एक सरस भूमिका तापसीनं केल्या आहेत. पिंक चित्रपटात ती पहिल्यांदा महानायक बच्चन  यांच्यासोबत दिसली. 

PHOTOS : अभिनेत्री मितालीचं बोल्ड फोटोशूट

२०१६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील भूमिकेसाठी तापसीचं खूपच कौतुक झालं. समीक्षक, प्रेक्षक खुद्द बच्चन यांच्याकडूनही तापसीला कामाची पोचपावती मिळाली. ' जो तो माझ्या कामाचं कौतुक करत होतं, पुरस्कार मीच जिंकणार अशी आशा होती. पुरस्कार सोहळ्यात तूच बाजी मारशील असं मला दिग्दर्शक सूजीत सरकारनंही सांगितलं होतं. तू नवीन कपडे तयार ठेव असंही त्यांनी मला सांगितलं होतं. मात्र त्यावर्षी मला अनेक पुरस्कार सोहळ्यात साधं नामांकनही मिळालं नाही. तेव्हा मनातून मी खूप दुखावले होते , असं तापसी म्हणाली. 

वडील विलासराव देशमुखांवर बायोपिक? रितेश म्हणतो..

त्यावेळी मी या चित्रपटसृष्टीत नवखी होते, पुरस्कार न मिळाल्यानं भरपूर वाईट वाटलं मात्र आता त्याचा फारसा फरक पडत नाही असंही  तापसीनं  सांगितलं. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Taapsee Pannu says left heartbroken after performance in Pink was not even nominated by most award shows