पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ती तर कंगनाची 'सस्ती कॉपी', रंगोलीच्या टोल्यावर तापसी म्हणते...

तापसी पन्नू

 तापसी पन्नूला कंगना रणौतची  'सस्ती कॉपी' म्हणून हिणवणाऱ्या रंगोलीला तापसीनं उत्तर दिलं आहे. मला तिला उत्तर देण्यात वेळ फुकट घालवायचा नाही  असं तापसी म्हणाली.

नुकताच कंगनाच्या 'जजमेंटल है क्या' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. हा ट्रेलर पाहून अनेक बॉलिवूड स्टार्सनं ट्रेलरचं कौतुक केलं. अभिनेत्री तापसी पन्नूनंही ट्रेलरचं कौतुक केलं. मात्र कौतुक करताना तिनं कंगनाच्या नावाचा उल्लेख केला नाही. ही बाबा कंगनाची बहिण रंगोलीला खटकली. यावरूनच रंगोलीनं तापसीवर निशाणा साधला. 

वयानं लहान जोडीदार निवडणाऱ्या स्त्रिला म्हातारी म्हणून हिणवतात- मलायका

काही लोक हे कंगनाला कॉपी करून आपलं दुकान चालवत आहेत. तापसीनं यापुढे कंगनाची  स्वस्त: कॉपी होणं थांबवलं पाहिजे, असं रंगोली म्हणाली. रंगोलीच्या या टोल्यावर  तापसीनं उत्तर दिलं आहे.  'आयुष्य खूप छोटं आहे, या सर्व गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी मला वेळ खर्च करायचा नाही. माझ्या आयुष्यात लक्ष देण्याइतक्या खूप सुंदर घटना घडत आहेत.' असं  तापसी नेटवर्क १८ ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

थोडक्यात रंगोलीला उत्तर देऊन या  वादात उडी मारायची नाही असं तापसीनं स्पष्ट केलं आहे. यापूर्वी रंगोलीनं अभिनेता वरूण धवनवरही टीका केली होती. वरूणनं  'जजमेंटल है क्या' च्या ट्रेलरचं कौतुक करताना कंगनाच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. ही बाब रंगोलीनं दाखवून दिली, मात्र वरुणनं अतिशय संयमानं रंगोलीला उत्तर दिलं.