पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तापसी म्हणते, कार्तिकच्या शेजारी मुलींची गर्दी

तापसी

अभिनेता कार्तिक आर्यन हा सध्या खूपच चर्चेत आहे. अनेक मुलींना तो आवडतो त्यामुळे लोकप्रिय अभिनेत्याच्या यादीतही तो अव्वल आहे.  'प्यार का पंचनामा २' , 'सोनू की टिटू की स्वीटी'च्या यशानंतर कार्तिकच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. इतकंच नाही तर गेल्या काही महिन्यांपासून  अभिनेत्री सारा अली खान आणि अनन्या पांडे  या दोघींची नावं सतत कार्तिकशी जोडली जात आहेत. कार्तिकच्या चाहत्यांमध्ये मुलींची संख्या जास्त आहे. म्हणूनच अभिनेत्री तापसी पन्नूला कार्तिक सोबत डेटवर जाण्यास अजिबातच रस नाही. 

'तो मित्र असूनही सर्वात शेवटी गोष्टी माझ्या कानापर्यंत पोहोचतात'
 

 'गेम ओव्हर' च्या प्रमोशन दरम्यान तापसीला कार्तिकसोबत डेटवर जाणार का? असा प्रश्न गमतीनं विचारण्यात आला. मात्र कार्तिकच्या शेजारी मुलींची खूपच गर्दी आहे आणि मला त्याच्यासाठी रांगेत उभं राहायचं नाही असं तापसी म्हणाली अर्थात तिच्या बोलण्याचा रोख हा सारा अली खान आणि अनन्या पांडेकडे होता.  

बलात्कार प्रकरणी अटकेत असलेल्या करण ओबेरॉयला जामीन मंजूर

कारण सारानंतर अनन्या पांडेचं नाव कार्तिकशी जोडलं गेलं. या दोघांना अनेकदा सार्वजनिक ठिकाणीही एकत्र वावरताना पाहण्यात आलं. कार्तिकच्या आगामी 'पती पत्नी और वो' या  चित्रपटात पहिल्यांदा तापसीची वर्णी लागली होती. मात्र कोणतीही पूर्वकल्पना न देता  तापसीला या  चित्रपटातून वगळण्यात आलं तापसीऐवजी अनन्याची निवड करण्यात आली.