पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लहान मुलाविरोधात अपशब्द वापरणाऱ्या स्वराचं स्पष्टीकरण

स्वरा भास्कर

एका चॅटशोदरम्यान लहान मुलाविरोधात अपशब्द वापरणारी अभिनेत्री स्वरा भास्कर  वादात सापडली होती. मात्र यावर स्वरानं स्पष्टीकरण दिलं आहे. मी एका कॉमेडी शोमध्ये होते आणि जे मी बोलले ते मस्करीत म्हणाले, कोणालाही दुखवण्याचा माझा उद्देश नव्हता असं स्पष्टीकरण स्वरानं दिलं आहे.

'कयामत से कयामत तक' नं रातोरात पालटलं जूहीचं नशीब

स्वरा भास्कर 'सन ऑफ अभिष' या चॅट शोमध्ये सहभागी झाली होती. या चॅटशोमध्ये तिनं उमेदीच्या काळातला किस्सा सांगितला. एका जाहिरातीत तिनं एका बालकलाकारासोबत काम केलं होतं. यावेळी ४ वर्षांच्या बालकलाकारानं सेटवर वावरताना  आपल्याला आंटी म्हणून हाक  मारल्याचं तिनं सांगितलं. या मुलाचा उल्लेख करताना स्वरानं अपशब्द वापरले. त्याच्या 'आंटी' नावानं हाक मारण्यावर स्वराचा आक्षेप होता. हा आक्षेप दर्शवताना स्वरानं लहानमुलाप्रती वापरलेले अपशब्द अनेकांना खटकले. मात्र मी हे मस्करीत म्हणाले असं स्पष्टीकरण स्वरानं दिलं आहे. 

मुलींच्या विश्वात नेणाऱ्या बहुचर्चित 'गर्ल्स'चा ट्रेलर लाँच

मी कधीही लहान मुलांना शिव्या दिल्या नाही, तो एक विनोदी कार्यक्रम होता. मी मस्करीत म्हणाले होते जर हा शो कोणी पाहिला असेल तर अनेकांच्या लक्षात येईल की त्या मुलाला मदत करणारी मीच होते. मला लहान मुलं खूप आवडतात आणि मी नेहमीच त्यांच्यासोबत प्रेमाने वागते असं स्वरा म्हणाली. 

 स्वरा ही अनेकदा तिच्या ट्विटमुळे वादाच्या भोवऱ्यात असते. माझ्यावर उगाचच निशाणा साधला जात आहे असंही तिनं सांगितलं.

सारा अली खानचा फिटनेस फंडा; जिममधील व्हिडिओ व्हायरल