पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : स्वप्नीलच्या 'समांतर' प्रवासाची चित्तथरारक कथा

समांतर

आपलं नशीब आपण घडवत असतो या गोष्टीवर अनेकांचा विश्वास असतो मात्र, खरंच आपण आपलं नशीब जगतोय का? जे नशीब घेऊन आपण जन्माला आलो आहोत ते आपण जगत आहोत का? हा प्रश्न आपल्याला पडल्यावाचून राहत नाही! कोणीतरी जगलेलं आयुष्य जर तुमचे भविष्य ठरणार असेल, तर तुम्हाला त्या व्यक्तीमुळे तुमचं भविष्य जाणून घेता येईल ना! याच आशयाला अनुसरून एम एक्स प्लेअर घेऊन येत आहे एक चित्तथरारक कथा वेबसीरिजच्या रूपात.

PHOTOS : दीपिकाचे हे फोटो पाहून रणवीरही म्हणतो 'दया कर' 

एम एक्स ओरिजिनलची निर्मिती असलेली 'समांतर', या वेबसीरिजच्या रूपाने उलगडणार आहे कुमार महाजन या सामान्य माणसाचा आयुष्याचा रोमांचकारी प्रवास. कुमार महाजनचा या सामान्य माणसाचं आयुष्य बदलत ज्यावेळी त्याला समजत सुदर्शन चक्रपाणी या व्यक्तीचा भूतकाळ हा त्याचा भविष्यकाळ ठरणार आहे.

 'कुमार महाजन' साकारत असलेला स्वप्नील जोशी समांतरच्या निमित्ताने वेब दुनियेत पदार्पण करत आहे. या वेबसीरीजमध्ये स्वप्नील जोशी सामान्य माणसाचे धकाधकीचे जीवन जगताना दिसणार आहे, कुटुंबाच्या दैनंदिन गरज भागवत भागवत नाकी नऊ येत असताना कुमारला नोकरीवरून काढले जाते. तेजस्विनी पंडित ही स्वप्नील जोशींच्या पत्नीची भूमिका साकारत असून ९ भागांची ही वेबसीरीज सतिश राजवाडे यांनी दिग्दर्शित केली आहे.

Video : रजनीकांत- बेअरच्या 'Into the Wild'चा दमदार टीझर पाहिलात का?

ही समांतरची कथा ही बहुसंख्य प्रेक्षकांपर्यंत पोहचावी तसेच तिला भाषेचे बंधन नसावं म्हणून ही वेबसिरीज मराठी सोबतच हिंद, तामिळ आणि तेलगू या भाषेत सुद्धा प्रदर्शित होणार आहे. मराठी सोबत इतर ३ भाषेत 'समांतर' एकाचवेळी १३ मार्च रोजी एम.एक्स.प्लेयर प्रदर्शित होणार आहे.