पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बॉक्स ऑफिसवर 'मोगरा फुलला', तीन दिवसांत तापसीचा 'गेम ओव्हर'

मोगरा फुलला

या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपट  'मोगरा फुलला'ची  चलती पाहायला मिळाली. एकीकडे सलमानचा 'भारत', दुसरीकडे इंडिया पाकिस्तान मॅच आणि तापसीचा 'गेम ओव्हार'  असताना या चित्रपटानं  बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. तीन दिवसांत १ कोटी ४६ लाखांची कमाई  स्वप्नील जोशी, नीना कुळकर्णीच्या  'मोगरा फुलला' चित्रपटानं केली आहे.  

हा चित्रपट म्हणजे आई-मुलगा, प्रियकर-प्रेयसीच्या नाजूक नात्यांचा गुफंलेला गजरा होय. मोगरा फुलला' हा एक कौटुंबिक चित्रपट असून तो १४ जूनला प्रदर्शित झाला. या चित्रपटात स्वप्नील,  नीना यांच्याव्यतिरिक्त चंद्रकात कुलकर्णी, आनंद इंगळे, संदीप पाठक या कलाकारांच्या भूमिका देखील आहेत. या चित्रपटानं पहिल्या दिवशी ३८ लाख, दुसऱ्या दिवशी ५६ लाख तर  तिसऱ्या दिवशी ५२ लाखांची कमाई केली.  या चित्रपटाची एकूण कमाई  ही १.४६ कोटी झाली. विशेष म्हणजे तापसी पन्नूच्या गेम ओव्हर चित्रपटालाही त्यानं मागे टाकलं. 

रविवारी भारत पाकिस्तान असा विश्वचषक स्पर्धेतला हाय व्होल्टेज ड्राम पहायला मिळाला, असं असताना या  चित्रपटाला मराठी प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद लाभला.