पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्वप्नील जोशीचं वेबच्या दुनियेत पदार्पण

स्वप्नील जोशी

गेल्या काहीवर्षांत प्रेक्षकांची आवड पाहता अनेक कलाकार नवनवे प्रयोग करून पाहत आहेत. रेडिओ, मालिका, चित्रपट, नाटक यांच्यासोबतच आता वेबसीरिजची नवी दुनियाही विस्तारु लागली आहे. बहुतांश  प्रेक्षकांचा आता वेबसीरिजकडे कल वाढू लागला आहे. सध्यांचा ट्रेंड पाहता आता हिंदी मराठीतले अनेक बडे कलाकार या नव्या क्षेत्राकडे वळू लागले आहेत. मराठीतील प्रसिद्ध कलाकारदेखील वेबसीरिजच्या विश्वात पदार्पण करत आहेत. 

सैफवर नाराज नाही, काजोल म्हणते सारं काही आलबेल

मराठी सिनेसृष्टीत एका पेक्षा एक सुपरहिट कलाकृती देणारी दिग्दर्शक आणि अभिनेत्याची जोडी म्हणजे सतीश राजवाडे आणि स्वप्निल जोशी. ही जोडी वेबसीरिजच्या निमित्ताने लवकरच आपल्याला मनोरंजनाची एक दर्जेदार मेजवानी देणार आहेत. मालिका आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रात हिट ठरलेली ही जोडी, आता वेबदुनिया गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.

कोरोनामुळे मराठी कलाकारांचं होळी सेलिब्रेशन रद्द

एम एक्स ओरिजिनलची निर्मिती असणाऱ्या "समांतर" या वेबसीरीजमधून स्वप्नील जोशी वेबच्या दुनियेत पाय ठेवणार आहे. "समांतर" या मराठी एम एक्स ओरिजिनल वेबसीरीजचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले असून, या वेबसीरीज मध्ये स्वप्नील जोशी सोबत तेजस्विनी पंडित सुद्धा दिसणार आहे. या वेबसीरीजमध्ये स्वप्नील कोणाचा तरी शोध घेत आहे. त्याचा या शोधाचे कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आहे. 'समांतर' वेबसीरीजचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून, येत्या ९ मार्चला या वेबसीरीजचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.