पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

या मराठी अभिनेत्यानं घेतले पुष्पगुच्छ, हार तयार करण्याचे धडे

सुव्रत जोशी

आतापर्यंत विविध चित्रपट, मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप उमटवलेला अभिनेता सुव्रत जोशी आता फुलं विक्रेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. शंतनू गणेश रोडे दिग्दर्शित "गोष्ट एका पैठणीची''या चित्रपटात सुव्रतही प्रमुख भूमिकेत आहे.

या चित्रपटात अभिनेत्री सायली संजीव महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सायलीसह सुव्रत जोशीचीही अतिशय वेगळी आणि महत्त्वाची भूमिका आहे. भोर इथं या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. फुल विक्रेत्याच्या भूमिकेसाठी फुलपुडी बांधण्यापासून  ते पुष्पगुच्छ तयार करण्यापर्यंत काही खास कौशल्यं सुव्रतनं शिकून घेतली आहेत. 

Star Screen Awards : वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

'माझ्या रोजच्या जगण्यापेक्षा काहीतरी वेगळं असलेल्या, मी कधीही अनुभव न घेतलेल्या विश्वातल्या भूमिका मला करायला आवडतात. कारण अभिनेता म्हणून त्यात आव्हान असतं. या  चित्रपटातील फुल विक्रेत्याची भूमिकाही तशीच आहे. या भूमिकेसाठी कित्येक फुलवाल्यांचं तासनतास  निरीक्षण केलं. फुलांच्या पुडी बांधणं, झटपट हार करणं, गुच्छा तयार करणं शिकून घेतलं.' असं सुव्रत म्हणाला. 

'पानिपत' पुन्हा वादात, बंदीची मागणी

"गोष्ट एका पैठणीची'' या चित्रपटाची कथा अतिशय सुंदर आहे. या चित्रपटाचा मी एक भाग आहे हा आनंदाचा आणि समृद्ध करणारा अनुभव आहे,' असंही सुव्रतनं सांगितलं.