पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मिस युनिव्हर्ससाठी माझ्याऐवजी ऐश्वर्याला पाठवण्याचा होता प्रस्ताव, सुष्मितानं सांगितला किस्सा

सुष्मिता- ऐश्वर्या

अभिनेत्री सुष्मिता सेन आणि  ऐश्वर्या राय बच्चन या दोघीही बॉलिवूडमधल्या सौंदर्यवती. या दोघींनीही १९९४ मध्ये अनुक्रमे 'मिस युनिव्हर्स'  आणि 'मिस वर्ल्ड'चा किताब जिंकला. या दोघींमध्ये  सौंदर्य स्पर्धेपासूनच कोल्ड वॉर सुरू होतं अशा चर्चा होत्या. या गोष्टीला आता २५ वर्षे उलटली. या स्पर्धेदरम्यान नेमकं काय झालं होतं याचा किस्सा नुकताच सुष्मितानं एका मुलाखतीत सांगितला. 

मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी सुष्मिताची निवड झाली होती. तर मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी ऐश्वर्या ही भारताचं प्रतिनिधित्व करणार होती. फिलिपिन्समध्ये मिस युनिव्हर्सची स्पर्धा  रंगणार होती. मात्र स्पर्धेला निघण्याआधी सुष्मिताचा पासपोर्ट हरवला होता. 'प्रसिद्ध मॉडेल अनुपमा वर्मा  त्यावेळी समन्वयक म्हणून काम  पाहत होती. मी माझा पासपोर्ट तिला दिला होता. काही कायदेशीर बाबी पूर्ण करायच्या होत्या त्यामुळे तिला माझा पासपोर्ट हवा  होता. मी अगदी निश्चिंत्तपणे तिच्याकडे पासपोर्ट सुपूर्त केला. मात्र स्पर्धेला निघण्यासाठी अत्यंत कमी अवधी असताना तिच्याकडून तो पासपोर्ट हरवला. वेळ अत्यंत कमी असल्यानं ऐनवेळी मदत मिळणं अशक्य होतं.

 तेव्हा  माझ्याजागी ऐश्वर्याला  पाठवावं  असा  प्रस्ताव आयोजकांनी ठेवला. मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी बराच अवधी होता त्यावेळात माझा नवीन पासपोर्ट तयार झाला असता. तेव्हा माझ्याजागी ऐश्वर्यानं  मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्त्व करावं आणि तिच्याजागी मी मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताच प्रतिनिधित्त्व करावं असा प्रस्ताव माझ्यापुढे ठेवण्यात आला. जो एकाअर्थी योग्यही  होता. मात्र हा  प्रस्ताव ऐकून मला प्रचंड राग आला. मी इतके दिवस मिस युनिव्हर्स   स्पर्धेची तयारी केली आणि तिसऱ्या व्यक्तीच्या चुकीमुळे मला ही स्पर्धा हातून गमवायची नव्हती. मी नाही तर या स्पर्धेसाठी कोणीही जाणार नाही हे मी  जाहीर करून टाकलं. 

अखेर त्यावेळेचे केंद्रीय मंत्री राजेश पायलट माझ्या मदतीसाठी धावून आले.' सुष्मितानं  त्यावेळी घडलेला सर्व प्रकार राजीव मसांदला दिलेल्या  मुलाखतीत सांगितला. 'मी आणि ऐश्वर्या या भिन्न टोकावरच्या वक्ती आहोत. आम्हा दोघींमध्ये वाद आहे अशा चर्चा नेहमीच मला ऐकायला मिळतात मात्र आम्हा दोघींमध्ये केवळ मैत्रीपूर्ण नातं आहे. वाद अजिबात नाही', असं तिनं स्पष्ट केलं आहे.