पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सलमान खान विरोधातील ते सर्व गुन्हेगारी खटले सुप्रीम कोर्टाकडून रद्द

सलमान खान

हिंदी सिनेमा 'लव्हयात्री - ए जर्नी ऑफ लव्ह' या प्रकरणी अभिनेता सलमान खानविरोधात दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हेगारी खटले सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी रद्द केले. या प्रकरणात सलमान खानविरोधात दाखल करण्यात आलेले सर्व एफआयआर आणि गुन्हे रद्द करीत असल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे सलमान खानला दिलासा मिळाला आहे. 

एचडीएफसी बँकेची नेट बँकिंग सुविधा कोलमडली, ग्राहकांना मनस्ताप

धार्मिक भावना दुखावल्याच्या मुद्द्यावरून या सिनेमाविरोधात आणि सिनेमाचा निर्माता म्हणून सलमान खान विरोधात गुजरात आणि बिहारमध्ये काही जणांनी गुन्हे दाखल केले होते. लव्हयात्री या सिनेमाचे आधी नाव लव्हरात्री होते. पण त्याला काही हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला होता. नवरात्री या हिंदूंच्या सणावरून हे नाव तयार करण्यात आले आहे. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या असल्याचे या संघटनांचे म्हणणे होते. या पार्श्वभूमीवर सिनेमाचे नाव लव्हरात्रीवरून बदलून लव्हयात्री असे करण्यात आले होते. 

धक्कादायक, पुण्यात सिंहगड रस्त्यावर आढळला तरुणीचा मृतदेह

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने सलमान खानला अंतरिम दिलासा देताना त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई केली जाऊ नये, असे आदेश पोलिसांना दिले होते. राष्ट्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाने हा चित्रपट प्रदर्शित करण्याला परवानगी दिली होती. हा मुद्दा सुद्धा न्यायालयाने आपल्या अंतरिम आदेशावेळी विचारात घेतला होता.