पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हृतिकचा 'सुपर ३०' ऑनलाइन लीक

हृतिक रोशन

अभिनेता हृतिक रोशनच्या  'सुपर ३०' ला पायरसीचा फटका बसला आहे. पायरसीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या तामिळ रॉकर्स या साइटवरून हा चित्रपट लीक झाला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडाही उलटत नाही तोच  हा चित्रपट पायरसीचा बळी ठरला आहे. 

गेल्या वर्षभरात दाक्षिणात्यच नाही तर अनेक बॉलिवूड चित्रपटही तामिळ रॉकर्सवरून लीक करण्यात आले होते. यात 'उरी द सर्जिकल स्ट्राइक', 'टोटल धमाल', 'मणिकर्णिका', 'पद्मावत', 'उडता पंजाब' यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे. तामिळ रॉकर्सवरून चित्रपट लीक होण्याचं प्रमाण वाढतच चाललं आहे. सुरूवातीला ही किड फक्त दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला पोखरून काढत होती. आता मात्र बॉलिवूडसह, हॉलिवूड चित्रपटही लीक होऊ लागले आहे.

त्या फोटोमुळे प्रियांका Global Social Media Climbers Chart मध्ये अव्वल

वाढत्या पायरसीमुळे चित्रपटांच्या कमाईवर याचा परिणाम होत आहे. यामुळे निर्मातेही चिंतेत आहेत. रजनीकांतचा '2.0' हा बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी निर्मात्यांनी तामिळ रॉकर्स आणि त्याच्या अनेक मायक्रो साइट्सवर बंदी आणण्याची मागणी मद्रास हायकोर्टाकडे केली होती. त्यानंतर शेकडो मायक्रो साइट्सवर बंदी आणण्यात आली होती असं असूनही प्रदर्शनानंतर अवघ्या काही तासांत '2.0' लीक झाला होता. 

हृतिकचा 'सुपर ३०' हा गणिततज्ज्ञ आनंद कुमार यांच्यावर आधारलेला आहे. आयआयटीसाठी गरीब  मुलांना मोफत शिक्षण देणाऱ्या आनंद कुमार यांची ही कहाणी आहे. या चित्रपटानं तीन दिवसांत ५० कोटींहून अधिकची कमाई केली आहे.