पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतातल्या या ठिकाणी 'सुपर ३०' ची सुपरहिट कमाई

सुपर ३०

अभिनेता हृतिक रोशनच्या 'सुपर ३०' चित्रपटाची १०० कोटींच्या दिशेनं घोडदौड सुरू झाली आहे. हा चित्रपट बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान सारख्या राज्यात टॅक्स फ्री करण्यात आला आहे. गरीब मुलांना आयआयटीसाठी मोफत प्रशिक्षण देणाऱ्या आनंद  कुमार या गणिततज्ज्ञाची गोष्ट या चित्रपटात आहे. 

अभिनेत्री गायत्री जोशी ऑबेरॉयच्या क्रेडिट कार्डची माहिती चोरून लुटले ४० हजार

 'सुपर ३०' ची बॉक्स ऑफिसवरील कमाई ही जोरदार सुरू आहे. या  कमाईत मुंबई, दिल्ली, म्हैसूर या शहरांचा आणि पंजाब राज्याचा मोठा वाटा आहे. या ठिकाणी चित्रपटानं चांगली कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर चित्रपटाच्या कमाईत या शहरातील प्रेक्षकांनी  दिलेल्या योगदानाची आकडेवारी मांडली आहे. 

मुंबई - २७. ७१ कोटींची कमाई
दिल्ली - १८. २५ कोटींची कमाई 
पंजाब- ७.८४ कोटींची कमाई
म्हैसूर - ५.६१ कोटींची कमाई 

बिग बॉस मराठी २ : वैशाली म्हाडे घराबाहेर

ही आकडेवारी २० जुलैपर्यंतची आहे. आतापर्यंत या चित्रपटानं  ८८. ९० कोटींची कमाई केली आहे. तर आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं २२. ४७ कोटींची कमाई केली आहे. हृतिकसह मृणाल ठाकूरची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटांचं दिग्दर्शन  विकास बहलनं केलं आहे.