पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ह्रतिकच्या व्हॅनिटी व्हॅनची एक भिंत गणितातल्या समिकरणांनी भरलीये

ह्रतिकची व्हॅनिटी व्हॅन

ह्रतिक रोशनचा 'सुपर ३०' काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटात ह्रतिकनं एका गणिततज्ज्ञाची भूमिका साकारली होती. या भूमिकेचा अधिक अभ्यास करण्यासाठी ह्रतिकनं आपल्या व्हॅनिटी व्हॅनची एक भिंत गणितातल्या प्रश्नांनी अन् प्रमेयांनी भरून टाकली होती.

पानिपत : मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारं 'मर्द मराठा' शौर्यगीत

'सुपर ३०' च्या चित्रीकरणाला सुरूवात होण्याआधीच व्हॅनिटी व्हॅनची संपूर्ण भिंत प्रमेयानं भरली होती. ही भिंत आठवण म्हणून  ह्रतिकनं  तशीच ठेवली आहे. 'सुपर ३०' मध्ये ह्रतिकनं आनंद कुमार यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचं देशभरातून कौतुक झालं. समीक्षकांनीही हृतिकचं कौतुक केलं. हा चित्रपट हृतिकसाठी खूप खास होता, म्हणून हृतिकनं ही भिंत तशीच ठेवली आहे. 

आमिर खाननं वाढदिवशी जूहीला दिली होती आठवणीत राहण्याजोगी भेट

ह्रतिक 'सुपर ३०' नंतर 'वॉर' चित्रपटातही दिसला.  टायगर आणि ह्रतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेल्या 'वॉर'नं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली.  या चित्रपटातील अनेक साहसी दृश्य हृतिकनं केली होती. विशेष म्हणजे 'सुपर ३०' नंतर 'वॉर' च्या तयारीसाठी हृतिककडे केवळ दोन महिनेच होते. या दोन महिन्यात हृतिकनं मेहनत घेत उत्तम शरिरयष्टी  कमावली.