पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सनी- सोनालीचा 'जय मम्मी दी' पुढील वर्षी येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

जय माता दी

'उजडा चमन', 'प्यार का पंचनामा २',  'सोनू के टिटू की स्वीटी' सारख्या चित्रपटांतून नावारूपाला आलेला अभिनेता सनी सिंगचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  'प्यार का पंचनामा २' मधली सनीची सह अभिनेत्री सोनाली  सेहगल 'जय मम्मी दी' चित्रपटात त्याच्यासोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं आहे. 

रणवीरच्या 'जयेशभाई जोरदार'मधून ही अभिनेत्री करतेय बॉलिवूडमध्ये पदार्पण

या दोघांव्यतिरिक्त या चित्रपटात सुप्रिया पाठक, पुनम ढिल्लोदेखील दिसणार आहे. लग्नाच्या पोशाखात असलेल्या या युगुलास त्यांच्या आई एकमेकांपासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे असं पोस्टरमध्ये दाखवण्यात आलं आहे.  

त्यामुळे हा चित्रपट म्हणजे धम्माल कॉमेडी असणार हे नक्की. नवज्योत गुलाटी दिग्दर्शित विनोदी चित्रपट १७ जानेवारी २०२० मध्ये प्रदर्शित होत आहे. 

सख्ख्या नात्याहून अधिक घट्ट आहे लतादीदी- दिलीप कुमारांचं नातं