बऱ्याच वर्षापासून बॉलिवूडपासून दूर असलेली अभिनेत्री सनी लिओनी पुन्हा कमबॅक करणार आहे. 'करनजीत कौर द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी' या वेब सीरीजमध्ये तिने काम केले होती. तिच्याच आयुष्यावर आधारीत ही वेबसीरीज होती. त्यानंतर सनी लिओनी बॉलिवूडपासून गायब झाली होती. मात्र आता ती धमाकेदार कमबॅक करणार आहे. लवकरच ती एका वेबसीरीजमध्ये दिसणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वेब सीरीज निर्माती एकता कपूरने सनीला 'कामसूत्र'वर आधारीत एका वेबसिरीजसाठी ऑफर दिली आहे.
'जिस्म २', 'रागिनी एमएमएस २' आणि 'जॅकपॉट' या सारख्या चित्रपटात अभिनय केल्यानंतर सनी लिओनीने अभिनयापेक्षा जास्त आयटम साँग्स शूट केले. आता तिला एकता कपूरने 'कामसूत्र' वेबसीरीजसाठी ऑफर दिली आहे. या वेबसीरीजचे नाव देखील 'कामसूत्र' आहे. कामसूत्र पुस्तकावर आधारीत ही वेब सीरीज असणार आहे. रागिनी एमएमएस २ चित्रपटानंतर सनी आणि एकता तब्बल ५ वर्षानंतर एकत्र काम करणार आहे.
बॉलिवूडमध्ये १९९६ साली 'कामसूत्र'वर आधारीत एक चित्रपट तयार करण्यात आला होता. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये तो प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रेखा मुख्य भूमिकेत होती. अत्यंत बोल्ड सिन्समुळे या चित्रपटाला भारतातात बंदी घालण्यात आली होती. आता सनी लिओनी पुन्हा एकदा कामसूत्र वेबसीरीजमध्ये काम करणार आहे. एकता कपूरचे असे म्हणणे आहे की, 'सनी लिओनीपेक्षा ही भूमिका कुणीही चांगली करू शकत नाही.'