पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चित्रपटातून मोबाईल नंबर लीक झाल्यानं मनस्ताप, सनीनं मागितली तरुणाची माफी

सनी लिओनी

अभिनेत्री सनी लिओनीचा मोबाइल क्रमांक समजून जगभरातून आलेल्या शेकडो फोन कॉल्समुळे हैराण झालेल्या तरुणाची सनीनं माफी मागितली आहे. 

गेल्या आठवड्यात सनीची भूमिका असलेला 'अर्जुन पटियाला' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील एका दृश्यात सनी चित्रपटाचा नायक दिलजितला स्वत:चा मोबाइल क्रमांक देते, असं दाखवण्यात आलं आहे. चित्रपट पाहायला आलेल्या अनेक प्रेक्षकांनी हा क्रमांक आपल्या फोनमध्ये सेव्ह केला. चित्रपटात सनीनं सांगितलेला क्रमांक तिचाच आहे असं वाटल्यानं शेकडो लोकांनी या क्रमांकावर फोनही करून पाहिला. हा क्रमांक प्रत्यक्षात पुनित अग्रवाल या दिल्लीस्थित २६ वर्षीय व्यावसायिकाचा होता. 

कतरिनाची बहीण करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

सनीनं या तरुणाची माफी मागितली आहे, तुला या सगळ्याचा मनस्ताप व्हावा अशी माझी बिलकुल इच्छा नव्हती. मात्र तुला नक्कीच काही रंजक लोकांचे फोन आले असतील असं सीन झूम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. 

'मिशन मंगल'च्या मराठी डब व्हर्जनला मनसेचा विरोध

सनी लिओनीचा फोन क्रमांक समजून जगभरातून पुनितला ५००  हून अधिक फोन आले होते. या नको असलेल्या फोन कॉल्समुळे हैराण झालेल्या पुनित अग्रवालनं दिल्ली पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती.