पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अठरा वर्षांनंतर 'गदर'च्या सीक्वलची चर्चा

गदर एक प्रेमकथा

भारत पाकिस्तानची फाळणी आणि या काळात फुललेली प्रेमकथा 'गदर' चित्रपटातून दाखवण्यात आली होती. या चित्रपटाचा  १८ वर्षांनंतर  सीक्वल येणार आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट २००१ मध्ये प्रदर्शित झाला होता. अमिशा पटेल, सनी देओल यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटानं तुफान यश  मिळवलं होतं. आजही स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिनी हा चित्रपट आवर्जून दाखवला जातो. 

फिल्मफेअरच्या वृत्तानुसार निर्माते गदर एक प्रेमकथा चित्रपटाचा सीक्वल तयार करण्याच्या विचारात आहेत. तारा (सनी देओल), सकिना ( अमिशा पटेल) आणि त्यांचा चिमुकला जीत यांचं  १८ वर्षांनंतर काय झालं हे या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. चित्रपटाच्या कथेला भारत पाकिस्तान फाळणीची किनार असणार आहे.

'गदर' चित्रपटातले संवाद, या चित्रपटातील गाणी आणि हृदयस्पर्शी कथा अनेकांना भावली होती. काळीज पिळवटून  काढलेल्या चित्रपटाच्या कथेनं बॉक्स ऑफिसवरही तुफान कमाई केली होती. बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून 'गदर'  आजही ओळखला जातो. या चित्रपटाचा सीक्वल येणार अशी चर्चा असली तरी यासंदर्भात अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल असं म्हटलं जात आहे.