पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुस्लिम सून चालते पण जावई नको, सुनैनाच्या प्रियकराचा सवाल

रुहेल आमिन

मी ज्या मुलावर प्रेम करते तो मुस्लिम असल्यानं वडिलांनी कानशिलात लगावली होती.  माझं प्रेमप्रकरण वडिलांना मान्य नसल्यानं माझा जाज केला जात असल्याचा आरोप सुनैनानं गेल्याचं आठवड्यात केला होता. या प्रकरणात तिचा प्रियकर रुहेल आमिन यांनं मौन सोडलं आहे. मुस्लिम सून चालते पण जावई नको हा किती विरोधाभास आहे असा टोला रुहेल यांनी रोशन कुटुंबाला  लगावला आहे.  हृतिकची पत्नी ही मुस्लिम होती हे देखील त्यानं दाखवून दिलं. 

रुहेल  मुस्लिम असल्यानं रोशन कुटुंबीयांकडून होणाऱ्या विरोधावर त्यानं नेटवर्क १८ या वृत्तवाहिनीशी  बोलताना चर्चा केली. एखादी व्यक्ती विशिष्ट धर्माची आहे म्हणून तिच्यावर दहशतवादी असल्याचा ठपका लावणं हे पूर्णपणे चुकीचं आहे, अशा मानसिकतेचा तीव्र शब्दात निषेध करायलाच हवा, रोशन कुटुंबातच किती मोठा विरोधाभास आहे असं म्हणत हृतिकची पत्नी ही मुस्लिम होती हे दाखवून दिलं. 

माझा कंगनालाच पाठिंबा, हृतिकच्या बहिणीची कबुली

कंगनाची  बहीण रंगोली हिनं आपल्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून सुनैनाचं प्रेमप्रकरण उघड केलं होतं. तेव्हापासून सुनैना चर्चेत आली  होती. सुनैनानंही आपलं मुस्लिम मुलावर प्रेम असल्याचं एका  वेब पोर्टलला  दिलेल्या मुलाखतीत मान्य केलं आहे. ' माझं एका मुस्लिम मुलावर प्रेम आहे. हे कळताच वडिलांनी माझ्या कानशिलात लगावली होती. त्यांचं असं म्हणणं आहे की तो दहशतवादी आहे. जर तो दहशतवादी असता तर आता तो तरुंगात असता. तो मीडियामध्ये चांगल्या पदावर नक्कीच नसता. गेल्या काही दिवसांपासून मी हॉटेलमध्ये राहत आहे. गेल्याच आठवड्यात मी माझ्या पालकांच्या घरी राहायला आले. माझं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्याचं नाव रुहेल आमिन आहे. तो पत्रकार आहे. माझ्या कुटुंबीयांनी त्याचा स्वीकार करावा असं मला मनापासून वाटतं, मात्र आता त्यांनी माझं आयुष्य उद्धवस्त केलंय. मला हे सारं सहन होत नाहीये. तो वेगळ्या धर्माचा आहे म्हणून त्याला नाकारणं हे  कितपत योग्य आहे असा सवाल तिनं मुलाखतीतून विचारला होता. 

बिग बॉस मराठी २ : अभिजित बिचुकलेंविरोधातील तक्रार मागे

त्याचप्रमाणे भाऊ हृतिक रोशन आपल्याला कोणतीही मदत करत नसल्याचाही आरोप तिनं केला. हृतिक वडिलांच्या प्रभावाखाली आहे. त्याच्यासाठी वडील म्हणतील ती पूर्वदिशा आहे. त्यानं मला मदत करण्याचं मान्य केलं होतं, मात्र त्यानं त्याचा शब्द पाळला नाही. प्रत्येकजण मला त्रास देत आहे, असंही ती  या मुलाखती म्हणाली होती.