पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आता सर्व मोफत वाहिन्यांसाठी महिन्याला द्यावे लागणार इतके रुपये

टीव्ही वाहिन्या

दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) केबल आणि डिश टीव्हीच्या नियामक रचनेमध्ये सुधारणा केल्या आहेत. कमीत कमी शुल्कामध्ये ग्राहकांना जास्तीत जास्त वाहिन्या उपलब्ध करून देण्यासाठी हे बदल करण्यात आलेत. यापुढे सर्व मोफत वाहिन्यांसाठी महिन्याचे निश्चित शुल्क १६० रुपये करण्यात आले आहेत. याचा अर्थ केवळ मोफत वाहिन्या बघायच्या असतील तर ग्राहकांना महिन्याला १६० रुपये भरावे लागतील. १ मार्चपासून हे बदल अंमलात येणार आहेत. 

प्रत्येक पक्षात अंतर्गत कुरबुरी असू शकतात: संजय राऊत

एकाच कंपनीच्या वाहिन्यांच्या समूहासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कातही (नेटवर्क कॅपॅसिटी फी) बदल करण्यात आला आहे. २०० वाहिन्यांसाठी हे शुल्क जास्तीत जास्त १३० रुपये करण्यात आले आहे. ज्या वाहिन्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बंधनकारक केल्या आहेत. त्यांचा अंतर्भाव यामध्ये करण्यात आलेला नाही. 

'१४ एप्रिल २०२२ पर्यंत आंबेडकरांच्या स्मारकाचे काम पूर्ण करु'

एखाद्या कंपनीला आपल्या वाहिन्यांचे सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी सब्सक्रिप्शन घेणाऱ्या ग्राहकांना काही सवलत द्यायची असेल तर त्यालाही दूरसंचार नियामक प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. फक्त हे सब्सक्रिप्शन सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी असले पाहिजे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Subscribers to get all free to air channels for Rs 160 per month TRAIs new tariff framework