पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुबोध भावेच्या 'विजेता' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात

सुबोध भावे

मराठीतील सुप्रसिद्ध कलाकार सुबोध भावे लवकरच 'विजेता' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. क्रीडावर आधारित या चित्रपटात सुबोध क्रीडा परिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या म्हाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुलात या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सुबोधनं जुन्या आठवणी सांगितल्या.

मेट्रोला पाठिंबा देणाऱ्या बच्चन यांच्याविरोधात नाराजीचे सूर

१९९४ साली सुबोध पहिल्यांदा बालेवाडी क्रीडा संकुलात  आला होता. ' जवळपास २० वर्षांहून अधिक काळानंतर मी या जागेवर उभा आहे. १९९४ साली झालेल्या राष्ट्रीय खेळाच्या अनावरण सोहळ्यास मी आलो होतो. पुण्यातून आम्ही म्हाळुंगेला तो सोहळा पाहण्यास आलो. त्यावेळी मी कॉलेजमध्ये शिकत होतो. स्टेडियमचे पासही आमच्याजवळ नव्हते. आम्ही पोलिसांशी हुज्जत घातली होती. अखेर एका दयाळू पोलिसांनी आम्हाला स्टेडियममध्ये प्रवेश दिला होता. त्यानंतर इतक्या वर्षांनी मी चित्रीकरणासाठी आलो आहे' अशी गतकाळातली आठवण सुबोधनं सांगितली. 

'इंशाअल्लाह'तून सलमान बाहेर, आलियानं सोडलं मौन

सुबोध उत्तम अभिनेता आणि गायक आहे पण तो एक उत्तम खेळाडू देखील आहे. विद्यार्थीदशेत असताना त्यानं अनेक शालेय खेळांच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता.  खेळ हा विषय अधिक प्रिय असल्यानं मी चटकन  'विजेता'साठी होकार दिला होता. या भूमिकेसाठी मला विशेष मेहनत घ्यावी लागली नाही, असंही सुबोधनं सांगितलं. 

देशातल्या १०० ठिकाणी आमिरच्या चित्रपटाचं चित्रीकरण, हिंदीत विक्रम