पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Student Of The Year 2 : प्रेक्षकांकडून नापास मात्र कमाईच्या बाबतीत पास

स्टुडंट ऑफ द  इअर २

करण जोहरची निर्मिती असलेल्या आणि टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडे यांची प्रमुख भूमिका असलेला 'स्टुडंट ऑफ द  इअर २' चित्रपट गेल्याच महिन्यात प्रदर्शित झाला. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यास हा चित्रपट अपयशी ठरला असला तरी कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट पास झाला आहे. पुनीत मल्होत्राचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटानं तीन दिवसांत ३८. ८३ कोटींची कमाई केली आहे. 

 सरस्वतीची उपासना सोडून इतर सर्व काही सुरू असलेल्या करणच्या  कॉलेजची सोशल मीडियावर  अनेकांनी खिल्ली उडवली. असं कॉलेज कुठे अस्तित्वात असतं असा खोडकर सवालही अनेकांनी सोशल मीडयावर विचारला. चित्रपटाची कथा प्रेक्षकांना आवडली  नसली तरी बॉक्स ऑफिसवर मात्र हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटानं १२. ६ कोटींची. दुसऱ्या दिवशी १४ . ०२ कोटींची तर तिसऱ्या दिवशी १२.७५ कोटींची कमाई केली. प्रेक्षकांची मनं जिंकायला रुपेरी पडद्यावरचे हे तिन्ही विद्यार्थी नापास झाले असले तरी बॉक्स ऑफिसवर हे तिघंही पास झाले आहे. स्टुडंट ऑफ द  इअर २ नं तीन दिवसांत एकूण ३८. ८३ कोटींची कमाई केली आहे. २०१९ या वर्षात प्रदर्शनाच्या दिवशीच १० कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा हा पाचवा चित्रपट ठरला आहे.

या चित्रपटातून अनन्या पांडे आणि तारा सुतारिया या दोघींनी बॉलिवूडमध्ये पदार्पण  केलं आहे. या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर कमाईच्या आकड्यात सातत्य ठेवण्याचं मोठं आवाहन या 'स्टुडंट ऑफ द  इअर २' समोर असणार आहे. कारण या आठवड्यात अजय देवगनचा 'दे दे प्यार दे' हा चित्रपट देखील प्रदर्शित होत आहे.