पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हॉलिवूडमधल्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलीचा पॉर्न स्टार होण्याचा धक्कादायक निर्णय

सुप्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलीचा पॉर्न स्टार होण्याचा धक्कादायक निर्णय

'ज्युरासिक पार्क', 'लिंकन', 'टीनटीन' सारख्या अनेक  अफलातून गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक केलेले दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग यांच्या मुलीनं  पॉर्न स्टार होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. स्टीव्हन यांची  २३ वर्षांची दत्तक मुलगी मिकाएला हिनं अडल्ड इण्डस्ट्रीत करिअर करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

PHOTOS : जान्हवीसोबत 'भूत' पाहायला आली रिंकू

स्टीव्हन  आणि त्यांची पत्नी केट हिनं मिकाएलाला दत्तक  घेतलं होतं. तिनं पॉर्न व्हिडिओची निर्मिती करायला सुरुवात केली आहे. हे माझं शरीर, माझं आयुष्य, माझी निवड असल्याचं तिनं  'द सन'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. 

कमल हासन यांच्या 'इंडियन २'च्या सेटवर अपघात, ३ मृत्युमुखी

या क्षेत्रात काम  करायला मला  लाज वाटत नाही, असंही तिनं म्हटलं आहे. यामुळे मला पैश्यांसाठी पालकांवर अवलंबून  राहावं लागणार नाही. मी यापूर्वी काम केलं आहे मात्र त्या कामातून मला कधीही समाधान मिळालं नाही, मात्र आता मी माझ्या आवडीचं काम करणार आहे अशी बिंधास्त प्रतिक्रिया तिनं दिली आहे.