चित्रपटसृष्टीतील 'महिला सूपरस्टार' या नावानं श्रीदेवी ओळखल्या जायच्या. त्यांनी 'सदमा', 'चाँदनी', 'चालबाझ' पासून ते 'इंग्लिश विंग्शिल', 'मॉम' यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. पुरुषप्रधान बॉलिवूडमध्ये त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र या क्षेत्रात वावरताना जयाप्रदा, माधुरी दीक्षित सारख्या अभिनेत्री त्यांच्या कट्टर स्पर्धकही होत्या.
पती आदित्य पांचोली आणि मुलांवरील आरोपांवर झरिना वहाब यांनी सोडलं मौन
सुरुवातीच्या काळात जयाप्रदा या श्रीदेवींच्या कट्टर स्पर्धक समजल्या जायच्या. या दोघींमधले संबंधही फारसे चांगले नव्हते. या दोघींनी १९८४ साली प्रदर्शित झालेल्या 'मकसद' चित्रपटात एकत्र काम केले. यादोघींमधला कडवटपणा जावा यासाठी चित्रपटाचे अभिनेते राजेश खन्ना आणि जितेंद्र यांनी प्रयत्न केले. दोघांनी श्रीदेवी आणि जयाप्रदा यांना एका खोलीत कोंडून ठेवलं. कदाचित एकाच खोलीत राहिल्यानं या दोघींमध्ये संवाद होऊन सारं काही ठिक होईन असं दोघांना वाटलं.
बऱ्याच वेळानंतर राजेश खन्ना आणि जितेंद्र यांनी खोलीचं दार उघडलं तेव्हा जयाप्रदा आणि श्रीदेवी खोलीतील दोन वेगवेगळ्या टोकांना शांतपणे बसल्या होत्या. दोघींमधला कटवटपणा दूर करण्याचा राजेश खन्ना आणि जितेंद्र यांचा प्रयत्न पुरता फसला.